पोस्ट विवरण
सुने
कृषि
अनार
कीट
कृषि ज्ञान
नाशीजीव प्रबंधन
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
25 Mar
Follow

डाळिंब पिकातील कीटकांविषयीची माहिती व व्यवस्थापन! (Information and management of pests in pomegranate crops!)


नमस्कार शेतकरी बंधूंनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

डाळिंबाच्या लागवडीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतात, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू राजस्थान ही प्रमुख डाळिंब उत्पादक राज्ये आहेत. महाराष्ट्रात रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड सुरु होण्‍यापूर्वी सन 1989-90 मध्‍ये डाळिंब पिकाखाली 7700 हेक्‍टर क्षेत्र होते. डाळिंब पिकाची लागवड अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, वाशिम या जिल्ह्यात प्रामुख्‍याने होत असून इतर जिल्ह्यातही मोठया प्रमाणावर होत आहे. सद्यस्थितीत महाराष्‍ट्रामध्‍ये डाळिंब पिकाखाली 73027 हेक्‍टर क्षेत्र असून त्‍यापैकी सुमारे 41000 हेक्‍टर क्षेत्र उत्‍पादनाखाली आहे. अवर्षण प्रवण भागामध्‍ये हलक्‍या जमिनीत व कमी पावसावर तग धरणारे हे झाड असल्यामुळे या पिकाच्‍या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. डाळिंब पिकात हवामानानुसार, नवीन पालवी निघाल्यानंतर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. बागेतील आद्रता, अतिरिक्त सिंचन, अस्वच्छता, झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे डाळिंब बागेत किडींचा प्रादुर्भाव वाढत जातो. आजच्या आपल्या या लेखात आपण याच किडींच्या नियंत्रण व व्यवस्थापनाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

डाळिंब पिकात बहार धरल्यानंतर झाडाला ज्यावेळी नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते त्यावेळी खालील किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो:

  • मावा
  • तुडतुडे
  • फुलकिडे
  • पांढरी माशी
  • पिठ्या ढेकूण

डाळिंब पिकातील मावा (Pomegranate crop Aphids):

मावा किडीची लक्षणे (Symptoms of Aphids):

  • डाळिंब पिकाच्या कोवळ्या शेंड्यावर आणि फुलांवर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो.
  • यामुळे झाडाचे शेंडे चिकट होऊन वेडेवाकडे होतात आणि शेंड्याची वाढ खुंटते.
  • चिकटपणामुळे पानांवर काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते.

मावा किडीचे व्यवस्थापन (Management of Aphids):

  • निंबोळी अर्क (5%) - 600 मिली 300 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 150 मिली किंवा
  • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 240 मिली किंवा
  • इमिडाक्लोप्रीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 60 ग्रॅम किंवा
  • फेनप्रोपॅथ्रिन 30% ईसी (सुमिटोमो- मियोथ्रिन) 150 मिली किंवा
  • बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी (8.49 + 19.81% डब्ल्यू/डब्ल्यू) (बायर-सोलोमोन) 120 मिली 300 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी

डाळिंब पिकातील तुडतुडे (Pomegranate crop Jassid):

तुडतुड्यांची लक्षणे (Symptoms of Jassid):

  • तुडतुडे ही कीड पानातील रस शोषून घेते तसेच, तुडतुडे आणि त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूला राहून त्यातील रस शोषून घेतात.
  • तुडतुड्यांच्या शरीरातून स्त्रवणाऱ्या गोड चिकट मधासारख्या पदार्थामुळे, पानांवर काळ्या बुरशीची वाढ होते.
  • प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमध्ये अडथळा येतो.
  • या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने मुरगळतात व परिणामी झाडांची वाढ खुंटते.
  • तुडतुड्यांमुळे 50 ते 70% पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.

तुडतुड्यांचे व्यवस्थापन (Management of Jassid):

  • या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 60 ग्रॅम किंवा
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 150 ग्रॅम किंवा
  • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 240 मिली प्रति एकर 300 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डाळिंब पिकातील फुलकिडे (Pomegranate crop Thrips):

फुलकिड्यांची लक्षणे (Symptoms of Thrips):

  • फुलकिडे (Thrips) या कीटकांचा प्रादुर्भाव पानाच्या खालच्या बाजूला आढळून येतो.
  • हे कीटक पानावर, फुलावर ओरखडे पाडतात व त्यामधून निघणारा रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात, फुलांचे सौंदर्य कमी होते व पानांच्या कडा ह्या वरच्या बाजूला वळतात आणि बारीक होतात.
  • हे कीटक खोडातील देखील रस शोषून घेतात. त्यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
  • या किडीचा उपद्रव पीक लहान असतानाच सुरू होतो. ते मोठे होईपर्यंत राहतो.
  • झाडाची वाढ खुंटते. फळांचे नुकसान होते.

फुलकिड्यांचे व्यवस्थापन (Management of Thrips):

  • या कीडीच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावावेत.
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 150 ग्रॅम किंवा
  • या कीडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल 5% एससी (देहात-स्लेमाईट एससी) 600 मिली किंवा
  • ऐसफेट 50% + इमिडा 1.8% एसपी (यूपीएल-लान्सर गोल्ड) 450 ग्रॅम किंवा
  • फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी (देहात-डेमफीप) 150 ग्रॅम किंवा
  • फ्लॉनिकॅमिड 50% डब्ल्यूजी (यूपीएल-उलाला) 90 मिली 300 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

डाळिंब पिकातील पांढरी माशी (Pomegranate crop White fly):

पांढऱ्या माशीची लक्षणे (Symptoms of White fly):

  • पांढरी माशी या कीटकाची पिल्ले व प्रौढ माशी पानातील रस शोषतात. त्यामुळे पानांचा रंग पिवळसर होतो.
  • या किडीच्या जास्त उद्रेकामुळे फुलगळ होते.
  • झाडाची पाने लहान आकार घेऊन चुरडतात यामुळे उत्पादनात घट येते.
  • या माशीमुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो.

पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन (Management of White fly):

  • प्रति एकर शेतात 20-25 पिवळे चिकट सापळे वापरा.
  • कीटकाचा प्रभाव दिसून आल्यास एसीटामिप्रिड 20% एसपी (धानुका-धानप्रीत) 150 ग्रॅम प्रति 300 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
  • याशिवाय इमिडाक्लोरपीड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) 60 ग्रॅम किंवा
  • थायोमिथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 150 ग्रॅम 300 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.

डाळिंब पिकातील पिठ्या ढेकूण (Pomegranate crop Mealybug):

पिठ्या ढेकूण किटकाची लक्षणे (Symptoms of Mealybug):

  • पिठ्या ढेकूण किटक बुंध्यातील, ओलांड्यातील, पानांमधील, कोवळ्या फांदीमधील रसशोषण करतो यामुळे पाने पिवळी पडून सुकून जातात तसेच या किडीच्या शरीरातून चिकट पदार्थ बाहेर पडतो त्यामुळे त्या ठिकाणी मुंग्या तसेच बुरशीची लागण झालेली दिसून येते.
  • नवीन फुटीची वाढ खुंटते.
  • बुरशीमुळे पानांची अन्ननिर्मिती क्रिया मंदावते.
  • पिठ्या ढेकूण हा कीटक उष्ण आणि कोरड्या वातावरणात जास्त आढळतात तसेच या किटकाच्या शरीरावर कापसासारखा चिकट थर असल्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते.

पिठ्या ढेकूण किटकाचे व्यवस्थापन (Management of Mealybug):

  • डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 240 मिली अधिक फिश ऑइल रोझीन सोप 750 मिली 300 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • बुप्रोफेझीन 25% एससी (एचपीएम-अपोलो) 600 मिली अधिक फिश ऑइल रोझीन सोप 750 मिली 300 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही तुमच्या डाळिंब पिकातील किटकांचे व्यवस्थापन कसे करता? तुम्हाला या किटकांची काय लक्षणे तुमच्या पिकात दिसून आली? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. डाळिंब पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?

डाळींब पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्‍त आहे.

2. डाळिंबाचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?

डाळिंबाचे पिक कोणत्‍याही जमिनीत घेता येते.

3. डाळिंब पिकात कोणती आंतरपिके घेता येतात?

डाळिंबाच्या लागवडीनंतर सुरुवातीची दोन वर्षे बागेत दोन ओळींमध्‍ये कांदा, काकडी, मुग, चवळी, सोयाबिन यासारखी कमी उंच वाढणारी पिके आंतरपिके म्‍हणून घेता येतात.

51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ