पोस्ट विवरण
जाणून घेऊयात लाळ्या खुरकुत रोगाविषयी
नमस्कार पशुपालकांनो,
भारतातील पशुपालकांना व्यवसायात पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागते. जनावरे निरनिराळया रोगांना बळी पडत असतात ज्यामुळे पशुपालकांचे अतोनात नुकसान होते. त्याचपैकी एक अत्यंत घातक असा रोग म्हणजे लाळ्या खुरकुत रोग. लाळ्या खुरकुत हा आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा रोग आहे. या रोगामुळे आपल्या देशाचं १२ ते १४ हजार कोटी रुपयांचं नुकसान दरवर्षी होत असतं. म्हणूनच आजच्या या लेखात आपण अत्यंत घातक असणाऱ्या या लाळ्या खुरकुत रोगाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
लक्षणे:
- या आजारामध्ये जनावरांना उच्च ताप येतो. हा ताप काहीवेळेस 1-3 दिवस राहू शकतो.
- तोंडाद्वारे तंतुमय लाळ सतत येत राहते.
- तोंडावर व आतमध्ये पारदर्शक तंतुमय स्त्राव दिसू लागतो.
- शरीरात थकवा जाणवतो अशक्तपणा येतो.
- संकरित गाई या रोगास अत्यंत संवेदनशील आहेत.
- ही जनावरे लंगडताना दिसतात.
रोग होण्यामागची कारणे:
- हा विषाणुजन्य रोग आहे. अप्तोव्हायरस नावाचा विषाणू पिकोर्णाव्हीरीडी या कुटुंबातील आहे.
- या विषाणूच्या सात जाती असून साठाहून अधिक उपजाती आढळून आलेल्या आहेत.
- ओ, ए, सी, आशिया - 1, सॅट - 1, सॅट - 2 व सॅट - 3 अशा सात प्रमुख जाती आहेत. आपल्याकडे ओ, ए आणि आशिया - 1 या तीन जाती आढळून येतात.
- अधिक प्रकारच्या जाती असल्याने लसीकरणाच्या दृष्टीने प्रतिकारशक्ती तयार करण्यास बाधा आणू शकतात.
- हा विषाणू थंड वातावराणामध्ये अधिक आढळून येतो.
या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात कोणत्या जनावरांत दिसून येतो?
दोन खुरे असेल्या जनावरांमध्ये हा रोग जास्त आढळून येतो, यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी आणि वराह या जनावरांचा समावेश होतो.
उपचार:
- जखमेच्या बाहेरील भागावर अँटीसेप्टीक लावल्यास जखम भरून येण्यास मदत होते व माशांपासुन प्रतिबंध होतो.
- सामान्य व स्वस्त उपाय म्हणजे जखम स्वच्छ करून घेऊन त्यावरती कोल टार व कॉपर सल्फेट चे 5:1 हे द्रावण लावणे.
सावधगिरी:
- जास्त दूध देणाऱ्या दुभत्या गाई व विलायतेतील प्रजाती यांची संरक्षक उपाय नियमित करण्यात यावे.
- दोन प्रतिबंधक लसीकरण सहा महिन्याच्या अंतराने करण्यात यावे. त्यानंतर प्रत्येक वर्षी एक लसीकरण करणे आवश्यक आहे.
- रोगाची लागण झालेली जनावरे कळपातून वेगळे करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपल्या जवळील पशुवैद्यकीय डॉक्टरांना तात्काळ बोलवावे.
- ब्लिचिंग पावडर किंवा जंतुनाशक कार्बनिक आम्ल द्वारे जनावरांच्या गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.
- उपकरणांची योग्यरीत्या स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे.
- अतिरिक्त पशुखाद्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी.
- मृत जनावरांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी.
- माशा, कीटक यांच्यावर नियंत्रण ठेवावे.
तुमच्या जनावरांमध्ये लाळ्या खुरकुत रोगाची कोणती इतर लक्षणे दिसत आहेत का? त्यांच्याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. या गोष्टींचे पालन करून तुम्ही देखील लाळ्या खुरकुत रोगापासून जनावरांचे संरक्षण करू शकाल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ