पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
2 Jan
Follow

जाणून घेऊयात मुक्त संचार गोठा पद्धती

नमस्कार पशुपालकांनो,

मोकळ्या जागेत कुंपण करून जनावरांना बांधून न ठेवता मोकळे सोडले जाते. यालाच मुक्त संचार गोठा म्हणतात. या मुक्त संचार गोठ्यात वैरण, पाणी व स्वच्छ हवा 24 तास पुरवली जाते. बंदिस्त पद्धतीमध्ये गाई, म्हशींना एकाच जागी बांधल्यामुळे काही समस्या उद्भवत असल्याचे लक्षात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पायांच्या सांध्याचे, खुरांचे आजार, कासेचे आजार, गर्भाशयाचे आजार इत्यादी मोठे आजार संभवतात. त्यामुळे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पशुपालकांचा अधिक पैसा व वेळ खर्च करावा लागतो. म्हणूनच आजच्या या लेखात आपण मुक्त संचार गोठा पद्धतींविषयी जाणून घेणार आहोत.

मुक्त संचार गोठा पद्धतीचे फायदे:

  1. मुक्त संचार गोठ्यातून दररोज शेण उचलावे लागत नाही. त्यामुळे वेळ व श्रम वाचते.

  1. जनावरांना फिरण्याचे स्वातंत्र्य असल्याने पाय व खुरांचे आजार याचे प्रमाण खूपच कमी आहे.

  1. दुभत्या जनावरांना होणारा कासदाह आजार होण्याचे प्रमाण अत्यल्प असते.

  1. जनावरांना उन्हात अथवा सावलीत बसण्याचे स्वातंत्र्य असल्याने गरजेनुसार नैसर्गिक वातावरणाचा लाभ होतो.

  1. पिण्यासाठी पाणी 24 तास उपलब्ध ठेवल्यास तहान लागल्यानंतर पाणी पिणे जनावरांना शक्य होते. याचा फायदा उत्पादन वाढीतून दिसून येतो.

  1. नैसर्गिक सर्व सुविधा मिळाल्यामुळे गायी, म्हशी आनंदी वातावरणात राहतात. त्यामुळे म्हशींमधील पान्हा सोडण्याची समस्या सुद्धा कमी होते.

  1. मुक्त संचार गोठ्यात कोंबड्या सोडल्यास त्या जनावरांच्या अंगावरील व गोठ्यातील गोचीड, कीटक खातात त्यामुळे जैवीक नियंत्रण होते.

  1. दुग्धव्यवसायात वेळ, मनुष्यबळ व पैशांची बचत करण्याच्या दृष्टीने पशुपालकांनी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.

अशा पद्धतीने वेळ, श्रम व पैसा वाचविणारी मुक्त गोठा संचार पद्धत पशुपालकांना दुग्ध व्यवसायात फार महत्वाची ठरते.

तुम्ही कोणत्या गोठा पद्धतीचा वापर करता? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


41 Likes
2 Comments
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ