पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
12 Jan
Follow

जिल्ह्यात अवेळी पावसाने शेतकऱ्यांना धडकी

नाशिक: भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून हलक्या पावसाची शक्यता वर्तविली होती. तर मंगळवारी (ता. 9) सायंकाळी दिंडोरी, पेठ व सिन्नर तालुक्यांत हलक्या पावसाने हजेरी लावली. तर बुधवारी (ता. 10) निफाड, सिन्नर, चांदवड तालुक्यात हलक्या सरी बरसल्या. सध्या खरीप हंगामातील लाल कांदा काढणी व द्राक्ष खुडे सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पावसाची धास्ती घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांना रडविले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 2 ते 4 मिमी दरम्यान पाऊस झाला आहे. या पावसाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.


55 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ