सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 July
Follow
जलसिंचन संस्थांचे कर्जाचे थकित मुद्दल सरकार भरणार

राज्यातील सहकारी उपसा जलसिंचन संस्थांच्या कर्जावरील व्याजाच्या थकबाकीची संपूर्ण रक्कम संबंधित जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी माफ केली. त्यानंतर थकित मुदलाची रक्कम राज्य शासनातर्फे अदा करण्यात येईल. बंद पडलेल्या आणि अवसायनात निघालेल्या संस्थांच्या मुदलाची संपूर्ण थकबाकी तर कार्यरत संस्थांची निम्मी थकबाकी राज्य शासन भरणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणून त्यास मंजुरी घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत बुधवारी (ता. २४) घेण्यात आला.
32 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
