पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

कृषी अधिकाऱ्यांचा पीक नुकसानीकडे कानाडोळा, ओढ्याच्या शेतीचे पंचनामेच नाहीत

सांगली जिल्ह्यातील नेर्ले, कासेगाव परिसरात जून, जुलै, तसेच ऑगस्ट मधील पडणाऱ्या संततधार पावसामुळे भुईमूग, सोयाबीन, भात व ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणची शेती पाण्याखाली गेली असून शेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामे केले नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कृष्णा नदीच्या परिसरातील शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी वरवरची पाहणी केल्याने ओढ्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतीकडे दुर्लक्ष केल्याचे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.


46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ