पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 June
Follow

कृषी निविष्ठांच्या स्वस्त विक्रीला विरोध

एका विक्रेत्याने मुरूड (ता. लातूर) व तेर (ता. धाराशिव) येथील आपल्या कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांसाठी एक योजना सुरू करत स्वस्तात खत, बियाणे व निविष्ठांची विक्री सुरू केली आहे. याचा फटका अन्य कृषी सेवा केंद्रांना बसत असल्याचा दावा करत धाराशिव तालुका फर्टिलायझर्स पेस्टिसाईड्स सिड्स डीलर्स असोसिएशनने अशा प्रकारच्या विक्रीस आक्षेप घेतला आहे. तसेच, असोसिएशनने संबंधित विक्रेत्याला कृषी निविष्ठांचा पुरवठा केल्यास कंपन्यांच्या मालाची विक्री न करण्याचा इशाराही दिला आहे. दरम्यान, असोसिएशनच्या दबावामुळे काही कंपन्यांनी विक्रेत्याला निविष्ठांचा पुरवठा बंद करण्याच्या हालचाली करण्याची शक्यता आहे.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ