कृषी निविष्ठांवरील जीएसटी रद्द करण्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले संकेत

कृषी निविष्ठावरील वस्तु व सेवा कर म्हणजे जीएसटी रद्द करण्याची मागणी शेतकरी करत आहे. तसेच विविध राज्यातील सरकारांकडून आणि लोकप्रतिनिधीकडून कृषी निविष्ठावरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (ता. २६) कृषी अवजारांवरील जीएसटी रद्द करण्याचे संकेत लोकसभेत बोलताना दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, या चर्चेने जोर धरला आहे. ट्रॅक्टर, ठिंबक सिंचन, खत आणि किटकनाशक यावरील जीएसटी रद्द करण्याचा प्रस्ताव १७ सप्टेंबर २०२१ च्या जीएसटी परिषदेत आला होता. त्यावर चर्चा झाली, परंतु त्यावर एकमत निर्माण झालं नाही, असंही यावेळी अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या. तसेच यावर आता विचार सुरू आहे. त्यामुळे विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असंही अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगतिलं.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
