पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Aug
Follow
कृषिपंपांच्या नव्या वीज जोडणीसाठी प्रतीक्षाच
खानदेशात कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी अनेक शेतकऱ्यांची वणवण सुरूच आहे. यातच वीज वितरण कंपनीतर्फे अतिपाणी उपसा, मागील काळापासूनचे दुष्काळी क्षेत्र किंवा खालावलेली जलपातळी अशी कारणे सांगून शेतकऱ्यांना नवी वीज जोडणी कृषिपंपांना दिली जात नसल्याची माहिती आहे. जळगाव, धुळे जिल्ह्यांत सुमारे दोन हजार नवी वीज जोडणी मागणीचे प्रस्ताव काही महिने रखडले आहेत. मार्चपासून कोरोनाचा उद्रेक वाढल्याने कार्यालयात प्रवेश बंदी, अधिकाऱ्यांना भेटू दिले जात नसल्याचे प्रकारही सुरू झाले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे काही वर्षापूर्वी ज्या विहिरी अनुदान तत्त्वावर मागासवर्गीय, अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना देण्यात आल्या, त्या शेतकऱ्यांना देखील वीज जोडणी मिळत नसल्याची माहिती आहे.
42 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ