पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
22 Jan
Follow

कांदा बाजारावर आवकेचा दबाव कायम

सोयाबीन बाजाराने आजही शेतकऱ्यांचा हिरमोड केला. सोयाबीनची बाजारातील आवक कायम असून दरपातळीही दबावातच आहे. देशातील बाजारात आजही सोयाबीनला 4 हजार 500 ते 4 हजार 700 रुपयांचा भाव मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन निचांकी पोचले. सोयाबीनचे वायदे 12.19 डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे 363 डाॅलर प्रतिटनांवर होते. जागतिक पातळीवर सोयाबीन उत्पादनातील वाढ आणि कमी उठाव याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर दिसून येत आहे. पण देशात यंदा उत्पादन घटले आहे. असे असूनही भाव दबावात आहेत. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दरात काहीशी वाढ दिसून येऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ