पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Sep
Follow

कांदा भावाला सरकारमुळे बुस्टरडोस; कांद्यावरील निर्यात शुल्क निम्मे करून २० टक्क्यांवर, एमईपीही काढली

कांद्याच्या भावात कालच्या तुलनेत आज क्विंटलमागे जवळपास ३०० ते ५०० रुपयांची वाढ झाली. सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य काढले आणि निर्यात शुल्कही ४० टक्क्यांवरून २० टक्के केले. यामुळे कांदा बाजाराला आज बुस्टरडोस मिळाला. कांद्याचे शुक्रवारचे भाव ४ हजार २०० ते ४ हजार ४०० रुपये होते. हाच बाजार आज ४ हजार ७०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान पोचला. यापुढे कांद्याच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ