पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 Jan
Follow

कांदा दरात घसरण सुरूच

नोव्हेंबर 2023 मध्ये खरीप कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या सप्ताहापर्यंत आवक मर्यादित होती. तेव्हा प्रतिक्विंटल 3,500 रुपयांपर्यंत सरासरी दर होते. मात्र निर्यातबंदीमुळे क्विंटलमागे 1800 ते 1900 रुपयांपर्यंत घसरण झाल्याने आजवर 1700 कोटी रुपयांपर्यंत तोटा राज्यातील कांदा उत्पादकांचा आहे.

मात्र एकीकडे निर्यातबंदी, तर दुसरीकडे देशांतर्गत पुरवठा मंदावल्याने जानेवारीच्या सुरुवातीला 1800 ते 1900 रुपयांवरून दर 1300 रुपयांवर आले आहेत. त्यामुळे क्विंटलमागे 600 रुपयांपर्यंत तोटा सोसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दिवसेंदिवस कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी वाढत असल्याची गंभीर स्थिती आहे.


19 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ