पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
16 Apr
Follow

कांदा काढणीच्या कामाला वेग

पुणे: जुन्नरच्या पश्चिम भागात कांदा काढणीच्या कामांना सध्या वेग आला आहे. यंदाच्या वर्षी थंडीचे प्रमाण कमी राहिल्याने व उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने कांद्याच्या फुगवणीवर विपरीत परिणाम झाल्याचे कुसूर (ता. जुन्नर) येथील शेतकरी महेंद्र भगत यांनी सांगितले. बहुतांश ठिकाणी कांदा काढणी पूर्ण झालेली असून, कांदा शेतातच अरणी करून साठविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. काढणी केलेला कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ