पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Mar
Follow

कांदा निर्यात निर्णयाचे भिजत घोंगडे कायम

केंद्र सरकारच्या निर्यातबंदी निर्णयामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून कांद्याची पडझड कायम आहे. उत्पादकता व उत्पादन खर्चाच्या तुलनेत दराचे गणित जुळत नसल्याने आर्थिक नुकसान वाढते आहे. त्यामुळे कांदा उत्पादक पट्ट्यात केंद्र सरकारविरोधात संतापाचे वातावरण आहे. केंद्रीय मंत्री आणि सचिवांनी घोषणा केल्या. मात्र त्यात कुठलीही स्पष्टता नव्हती. आताही निर्यात घोषणेत गोंधळ कायम आहे. अद्यापही याबाबत अधिसूचना निर्यातदारांना मिळालेली नाही. त्यामुळे पुन्हा ही घोषणाच उरली असून केंद्र सरकारची कांदा निर्यातीबाबत मानसिकताच नसल्याची चर्चा पुन्हा पुढे येत आहे.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ