पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
21 Nov
Follow

‘काळं सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुऱ्हा म्हशीची वैशिष्ट्ये

नमस्कार पशु पालकांनो,

हरियाणा राज्यात मुऱ्हा जातीची म्हशी 'काळं सोनं' म्हणून ओळखली जाते. तिला हरियाणा राज्याची शानही म्हटले जाते. या जातीच्या मादी म्हशी जास्त दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. तर नर म्हशींचा उपयोग अवजड माल वाहून नेण्यासाठी केला जातो. या जातीच्या म्हशींचे मूळ ठिकाण हरियाणातील रोहतक, जिंद आणि हिस्सार आहे. याशिवाय पंजाब, दिल्ली तसेच महाराष्ट्रात देखील ही म्हैस आढळते.

मुऱ्हा म्हैस कशी ओळखावी?

  • या जातीच्या म्हशीचे शरीर गडद काळे असते.
  • या जातीच्या काही म्हशींच्या चेहऱ्यावर आणि पायावरही पांढरे डाग दिसतात.
  • या म्हशींना कुबड असतात पण कुबडाचा भाग हलकासा वर आलेला असतो.
  • मुऱ्हा म्हशीचे डोके लांब असते, शेपटी गुडघ्यापर्यंत लांब असते आणि पाय लहान व मजबूत असतात.
  • या जातीच्या म्हशीचे सरासरी वजन 450 किलो आणि उंची सुमारे 132 सेमी असते.
  • नर म्हशीचे सरासरी वजन 550 किलो आणि उंची सुमारे 142 सेमी असते.

मुऱ्हा म्हशीची वैशिष्ट्ये:

  • या जातीची म्हैस बाळंत झाल्यानंतर 1600-1800 लिटर दूध देते.
  • या जातीच्या म्हशींचा गर्भधारणा कालावधी 310 दिवसांचा असतो.
  • मुऱ्हा म्हैस दररोज 10 ते 12 किलोग्रॅम दूध देते. विशेष काळजी घेतल्यास, ती दररोज 20 किलोग्रॅम पर्यंत दूध देऊ शकते.
  • त्यांच्या दुधात 7 टक्क्यांपर्यंत फॅट असते.
  • 45 ते 50 महिन्यांच्या वयात या जातीची म्हैस पहिल्या वासराला जन्म देण्यास सक्षम होते. दुसरीकडे, योग्य काळजी घेतल्यास, 36 ते 40 महिन्यांच्या वयातही ती वासराला जन्म देऊ शकते.
  • 2 बाळंतपणांमध्ये 450 ते 500 दिवसांचे अंतर असते.

मित्रहो, तुम्ही कोणत्या जातीची म्हैस पाळता? हे कमेंटबॉक्समध्ये लिहून नक्की सांगा.

  • गाय पालन करून अतिरिक्त उत्पन्नाची सुवर्णसंधी मिळविण्यासाठी https://dehaat-kisan.app.link/3szd4HuTTEb हे वाचा.
  • यासोबतच पशु तज्ज्ञांशी मोफत सल्लामसलत करण्यासाठी देहातच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधा.
  • ही माहिती इतर पशु पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

56 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ