पोस्ट विवरण
सुने
पशुपालन ज्ञान
पशुसंवर्धन
DeHaat Channel
8 Jan
Follow

काळसर मांसामुळे कुक्कुटपालन जगतात वेगळी ओळख असणारी कडकनाथ कोंबडी

कडकनाथ कोंबडीचा काळसर रंग हा तिच्यामध्ये असलेल्या मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे आहे. या कोंबडीमध्ये मेलॅनिनचे प्रमाण अगदी जास्त असल्यामुळे तिचा रंग, त्वचा आणि मांससुद्धा काळसर आहे. काही प्रमाणात शरीरातील अवयवसुद्धा काळसर आहेत. या कोंबड्या इतर देशी कोंबड्याप्रमाणे फिकट तपकिरी रंगाचे छोट्या आकाराची अंडी घालतात. अंडी व मांस खाल्ल्याने शरीराला फायदाच होतो.

कडकनाथ कोंबडीची वैशिष्ट्ये:

  • या कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.
  • मुक्त संचार पद्धतीत या कोंबडीची हळुवार वाढ होते. चांगल्या प्रतीचे खाद्य दिल्यावर तीन ते साडेतीन महिन्यांत साधारण एक किलो वजन होते.
  • मास चविष्ट असून, रंग काळसर आहे.
  • प्रति वर्ष 80 ते 100 अंडी देते.

40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ