पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 Oct
Follow

कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी ई पीक पाहणीची अट रद्द; ७/१२ वरील नोंदीवरुनही मिळणार अनुदान

कापूस आणि सोयाबीन पिकांच्या अर्थसहाय्याच्या लाभासाठी आता ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे. आता ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन नोंद असेल तरीही अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे ई पीक पाहणीत सोयाबीन कापुस पिकाची नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने २०२३ च्या खरिप हंगामात कापूस व सोयाबीन पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट १ हजार रुपये आणि दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती. या घोषणेबाबतचे अर्थसहाय्य मंजूर केल्याचा निर्णय गुरुवारी (ता. २७) सप्टेंबर रोजी घेण्यात आला.


38 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ