पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
4 Mar
Follow

कापूस बाजारात तेजीचे वारे

मागील दोन आठवड्यांपासून कापसाच्या भावात सुधारणेचे वारे आहेत. वायदे आणि प्रत्यक्ष खरेदीत कापसाच्या भावात सुधारणा झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. मात्र कापसाच्या प्रत्यक्ष खरेदी दरातील सुधारणा कायम होती. देशातील बाजारात कापसाचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये 500 ते 800 रुपयांनी वाढले आहेत. देशातील कापूस बाजारातील परिस्थिती आणखी सुधारणेच्या बाजूने आहे. तरीही काही कारणांमुळे कापूस बाजारात चढउतारही दिसू शकतात, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.


34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ