पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
6 Sep
Follow

कापूस, सोयाबीन मदत योजनेची नोंदणी १३ लाखांच्या पुढे

हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यासाठी राज्यात आतापर्यंत १३ लाखांहून अधिक कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. कृषी सहायकांनी बहिष्कार टाकल्यामुळे यापूर्वी नोंदणीची कामे रखडली होती. राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत वाटली जाणार आहे. कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले की, ई-पीक पाहणीची सर्व आकडेवारी महसूल विभागाकडून कृषी विभागाकडे आली आहे. कृषी विभागाने या माहितीमधील शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या गावनिहाय प्रसिद्ध केल्या आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार क्रमांकाची माहिती कृषी सहायकाकडे देणे सुरू केले आहे.


39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ