कापूस वायद्यांमध्ये तेजी; कापूस दरातील 'ऑफ सिझन' मधील तेजी हीच का?

कापूस वायद्यांमध्ये दोन दिवसात चांगली तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे ऑफ सिझनमध्ये अपेक्षित असणारी तेजी हीच आहे का? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. पण बाजारातील एकूणच समिकरण पाहीलं तर देशातील बाजाराला आधार देणारे काही घटक आहेत. या घटकांमुळे देशातील बाजारात कापसाला आधार मिळू शकतो. पण बाजारात चांगली तेजी येण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात आणखी सुधारणा आवश्यक आहे. त्यातही कापूस बाजाराचे लक्ष अमेरिकेच्या कापूस पिकाच्या अहवालाकडे आहे. देशातील बाजारातही कापूस भावात सुधारणा झाली. वायद्यांमध्ये अडीच महिन्यांनंतर कापूस वायदे ५९ हजारांच्या पार गेले. आज दुपारी एमसीएक्सवर कापसाचे वायदे ५९ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर होते. तर बाजार समित्यांमधील भावही १०० ते १५० रुपयांनी वाढला होता. काही बाजारात कापसाचा कमाल भाव ८ हजारांवर गेला. तर सरासरी भावपातळी ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांवर होती. अनेक दिवसांनंतर कापूस बाजारात लक्षणीय वाढ झाल्याने दरात चांगली तेजी येईल का? असा प्रश्न शेतकरी आणि व्यापारीही विचारत आहेत.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
