पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 Nov
Follow
कापूस वेचणीला मजूर मिळेनात; शेतकरी त्रस्त
कापूस वेचणीला आलाय, पण मजूर मिळेनात. जे मजूर आहेत ते वाढीव वेचणी दर मागत असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यात कापूस उत्पादक त्रस्त झाले आहेत. वेचणीला यंदा बारा ते चौदा रुपये दर द्यावा लागत असल्याची स्थिती आहे. कापसाचा दर मात्र वरचेवर खालीच येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा दीड लाख हेक्टरच्या जवळपास कापसाचे क्षेत्र आहे. प्रामुख्याने शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, कर्जत, जामखेड आदी भागांत कापसाचे क्षेत्र अधिक आहे. सध्या शेतकरी कापूस वेचणीत व्यग्र आहेत. त्यात दिवाळी, पाडवा, भाऊबीज सणाची धामधूम होती. त्यामुळे शेत मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे.
23 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ