सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Jan
Follow
कच्च्या तागाच्या हमीभावात ३१५ रुपयांची वाढ; केंद्र सरकारचा निर्णय

केंद्र सरकारने २०२५-२६ च्या आर्थिक वर्षासाठी कच्चा तागाच्या किमान आधारभूत किंमतीत म्हणजेच हमीभावात वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय आर्थिक घडामोडी समितीची बैठक बुधवारी (ता.२२) आयोजित करण्यात आली. या बैठकीत कच्च्या तागाच्या हमीभावात प्रतिक्विंटल ३१५ रुपयांची वाढ केली. २०२५-२६ साठी कच्चा तागाचा (टीडी-३) हमीभाव प्रतिक्विंटल ५ हजार ६५० रुपये जाहीर करण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे ताग उत्पादकांना सरासरी ६६.८ टक्के अधिकचं उत्पन्न मिळेल, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
45 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
