सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Nov
Follow
कडधान्य उत्पादनासाठी सरकारची 'करार शेती'
देशातील घटते कडधान्य उत्पादन वाढविण्यासाठी आणि वाढती आयात कमी करण्यासाठी सरकार पहिल्यांदाच थेट शेतकऱ्यांसोबत 'करार शेती' करत आहे. सरकारने तमिळनाडू, बिहार, झारखंड आणि गुजरातमध्ये तूर आणि मसुराची १ हजार ५०० हेक्टरवर लागवडीसाठी करार केले आहेत. देशात कडधान्याची मागणी वर्षागणिक वाढत आहे. पण दुसरीकडे कडधान्याचे उत्पादन घटत आहे. मागणी आणि पुरवठ्यात तफावत येत असल्याने दरावरही परिणाम होत आहे. २०२२ च्या आर्थिक वर्षात देशातील कडधान्य उत्पादन २७३ लाख टन होते. त्यानंतर २०२३ मध्ये उत्पादन कमी होऊन २६० लाख टनांवर स्थिरावले. २०२४ च्या आर्थिक वर्षात तर दुष्काळी स्थिती असल्याने उत्पादन २४५ लाख टनांपर्यंत कमी झाले.
50 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ