सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
केळी दरात घसरण सुरूच

मध्य प्रदेशातील बाजारात केळीच्या आवकेत मोठी वाढ झाल्याने खानदेशात शिवार किंवा थेट खरेदीत केळी दरात मागील १२ ते १५ दिवसांत एक क्विंटलमागे ११०० ते १००० रुपयांची घट झाली आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारात लिलावामध्ये जे दर केळीस मिळतात, त्याच दरात खानदेशात केळीची शिवार किंवा थेट खरेदी केली जाते. बऱ्हाणपुरात केळीची आवक सतत वाढत आहे. तेथील आवक २२७ ट्रकपर्यंत (एक ट्रक १६ टन क्षमता) मागील शनिवारी (ता. २८) पोहोचली होती. ही आवक मागील पंधरवड्यात ११० ते १२० ट्रक प्रतिदिन अशी होती. खानदेशात केळी आवकेत फारशी वाढ झालेली नाही. परंतु नजीकच्या राज्यातील बाजारात केळीची आवक वाढल्याने त्याचा परिणाम खानदेशात केळी दरांवर सतत होत आहे.
53 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
