पोस्ट विवरण
सुने
केला
बागायती पिके
DeHaat Channel
15 Jan
Follow

केळी पिकाचे थंडीपासून कसे कराल व्यवस्थापन

केळी पिकाचे थंडीपासून कसे कराल व्यवस्थापन

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

केळी उत्‍पादन करणाऱ्या प्रांतात क्षेत्राच्‍या दृष्‍टीने महाराष्‍ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी, व्‍यापारी दृष्‍टीने किंवा परप्रांतात विक्रीच्‍या दृष्‍टीने होणाऱ्या उत्‍पादनात महाराष्‍ट्राचा पहिला क्रमांक लागतो. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण चौवेचाळीस हजार हेक्‍टर क्षेत्र केळीच्‍या लागवडीखाली असून त्‍यापैकी निम्‍म्‍यापेक्षा अधिक क्षेत्र जळगांव जिल्‍हयांत आहे. आता बऱ्याच भागात थंडी सुरू झाली आहे, त्यामुळे तापमान कमी होत आहे. मागील मृगबाग लागवड केलेल्या केळी बागेची मुख्य वाढीची अवस्था आहे. साध्य एकही ठिकाणी कांदे बाग लागवड झालेली आहे. केळीसाठी 16 ते 40 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. काही दिवसात तापमान 16 अंश सेल्सिअसच्याही खाली जाऊ शकते. अशा तापमानाचा केळीच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. म्हणूनच आजच्या या भागात आपण केळी पिकाचे थंडीपासून कसे व्यवस्थापन करायचे याविषयी जाणून घेणार आहोत.

थंडीमुळे केळीच्या पिकावर होणारे अनिष्ट परिणाम:

 • कमी तापमानाचा कंद उगवण, मुळयांची वाढ, मुळयांची कार्यक्षमता, पाने येण्याचा वेग, पानावर चट्टे येणे, झाडांची वाढ मंदावणे, फळांची वाढ मंदावणे, फळपक्वतेस येण्याचा कालावधी वाढणे, केळी पिकण्याची क्रिया मंदावणे, इत्यादी दृष्ट व अदृष्य परिणाम होतात.
 • केळीच्या या सर्व अवस्था कमी तापमानास अत्यंत संवेदनशील असून केळीच्या चांगल्या वाढीसाठी तसेच उत्पादन व गुणवत्तेसाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

लागवडीवरील परिणाम:

 • टिशू कल्चर रोपे जमिनीत रूजण्यासाठी 16 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान तापमान लागते.
 • लागवडीसाठी जितका उशीर तितकाच थंडी वाढल्याने रोपांच्या वाढीवर परिणाम होईल.

मुळावरील परिणाम:

 • कमी तापमानामुळे मुळांची संख्या व लांबी कमी होते.
 • मुळांच्या अन्न व पाणी शोषणाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

पानांच्या वाढीवरील परिणाम:

 • थंडीच्या दिवसांत पाने येण्याचा वेग मंदावतो.
 • कमी तापमानामुळे पाने कमी अंतरावर येतात , त्यामुळे पानांचा गुच्छ तयार होतो.
 • पानांचा कमी भाग सूर्यप्रकाशात येत असल्याने अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.

केळीच्या झाडाच्या वाढीवरील परिणाम:

 • झाडाची वाढ मंदावते, वाढ कमी झाल्यामुळे केळफूल बाहेर पडण्यास उशीर लागतो.
 • केळी निसवण्याचा कालावधी लांबतो.

बुंध्यावरील व घडावरील परिणाम:

 • कमी तापमानामुळे केळीच्या बुंध्यावर व घडाच्या दांड्यावर काळपट तपकिरी चट्टे दिसून येतात हे चट्टे वाढत जातात व घड सटकतो.

थंड हवामानात करायच्या उपाययोजना:

 • झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार प्रति झाड 250 ते 750 ग्रॅम निंबोळी ढेप द्यावी, शक्य असल्यास बागेत सेंद्रिय आच्छादन करावे.
 • शेतात शिफारशीप्रमाणे शेणखत अथवा कंपोस्ट खत वापरावे.
 • रासायनिक खतांचा शिफारशीनुसार वापर करावा. प्रामुख्याने पालाशचे प्रमाण योग्य असावे.
 • घडावर कोरडया केळी पानांचे किंवा 100 गेज जाडीच्या, 2-6 टक्के सच्छिद्रतेच्या पॉलीप्रापिलिनच्या स्कर्टिग बॅगांचे आवरण करावे
 • बागेच्या चारही बाजूंनी वारा रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
 • बागेच्या कडेने शेवरी, गिरीपुष्प या वनस्पतींची लागवड करावी. यामुळे थंड वारे अडवले जाऊन केळी पिकाचे अति थंड वाऱ्यापासून संरक्षण होते.
 • खोडालगत आच्छादन करावे जेणेकरून, कमी तापमानाचा मुळांच्या वाढीवर परिणाम होणार नाही.
 • थंडीच्या काळात शक्‍यतो रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे.
 • रात्रीच्या वेळेस बागेच्या चोहोबाजूंनी काडीकचरा जाळून धूर करावा.
 • रोपांचे वय 4 ते 7 महिने असताना बुंध्याजवळ घडाची सूक्ष्म निर्मिती होत असते. त्यामुळे तापमान 20 अंश से. ते 23 अंश सेल्सिअसपर्यंत संतुलित ठेवले तर घडाची निर्मिती चांगली होते. त्याकरिता सल्फर 90% (देहात) 6 किलो प्रति एकर ठिबक सिंचनाद्वारे द्यावे.
 • मॅग्नेशिअम सल्फेट व शिफारशीत सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबकमधून द्यावीत. शक्‍यतो या काळात खांदणी करू नये.

बागेत करपा किंवा सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास पुढील फवारण्या घ्याव्यात:

 • कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी (ईफको-यामाटो) 2 ग्रॅम किंवा प्रोपिकोनाझोल 25% ईसी (क्रिस्टल-टिल्ट) 2 मि.ली किंवा ट्रायकोडर्मा विरिडी 1% डब्ल्यूपी (ईफको-ट्राईको पॉवर) 3 ग्रॅम या बुरशीनाशकाची प्रति लिटर पाण्यात स्टिकरसह मिसळून आलटून पालटून फवारणी करावी.
 • पहिल्या फवारणी नंतर 7 ते 21 दिवसांच्या अंतराने रोगाच्या तीव्रतेनुसार 3 ते 4 फवारण्या घ्याव्यात.
 • तसेच सुरवातीच्या फवारण्यांनंतर रोगाच्या तीव्रतेनुसार प्रति 10 लीटर पाण्यातप्रोपिकोनाझोल 25% ईसी (क्रिस्टल-टिल्ट) 0.5 मि.ली. किंवा कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी (ईफको-यामाटो) 2 ग्रॅम +सिलिकॉन - यूपीएल गेनेक्सा 2 मिली प्रति लिटरच्या 2 ते 3 फवारण्या दर 2 ते 3 आठवडयाच्या अंतराने कराव्यात.

आम्हाला खात्री आहे वरील उपाययोजनांचा वापर करून तुम्ही थंड हवामानात तुमच्या केळी पिकाचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करू शकाल. तुम्ही या व्यतिरिक्त केळी पिकाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना करता याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.


58 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ