पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
5 Aug
Follow

खानदेशात बाजरीची पेरणी रखडली

खानदेशात यंदा बाजरीची पेरणी अपेक्षेपेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. यातच पावसामुळे किंवा शेतात वाफसा नसल्याने पेरणी रखडली आहे. आगाप पेरणी यशस्वी झाली आहे. परंतु अनेक शेतकरी पेरणीसाठी अनुकूल वातावरणाची प्रतीक्षा करीत आहेत. खानदेशात खरिपात बाजरीची पेरणी सुमारे सात ते आठ हजार हेक्टरवर केली जाते. बाजरीसाठी धुळे जिल्हा प्रसिद्ध आहे. धुळ्यातील शिंदखेडा, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, अमळनेर, पारोळा आदी भागातही खरिपातील बाजरी असते. तसेच तापी, गिरणा, अनेर, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्रातही काळ्या कसदार जमिनीत केळी व अन्य पिकांना बेवड, जमीन सुपीकता यासाठीदेखील अनेक शेतकरी बाजरी पेरतात.


18 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ