पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Jan
Follow

खानदेशात भुईमूग पेरणी पूर्णत्वाकडे

जळगाव: खानदेशात भुईमुगाची पेरणी किंवा लागवड पूर्ण होत आली आहे. यंदा क्षेत्रात किंचीत घट होईल, असे चित्र आहे. पेरणी या आठवड्यातही होईल, असेही संकेत आहेत. आगाप भुईमुगाची पेरणी नोव्हेंबरच्या अखेरिस अनेकांनी केली. डिसेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात भुईमूग पेरणीला वेग आला. अनेकांची पेरणी नोव्हेंबरअखेरिस झालेल्या पावसाने रखडली होती. सर्वाधिक पेरणी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झाली आहे. खानदेशात भुईमुगाची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केली जाते. पुढील पाच ते सहा दिवस पेरणी होईल. त्यासाठी शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या वाणांना पसंती देतील, असेही संकेत आहेत.


53 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ