सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात देशी हरभऱ्याची आवक वाढू लागली

जळगाव: खानदेशात देशी प्रकारातील हरभऱ्याची विविध बाजार समित्यांत आवक सुरू झाली आहे. दर किमान 5771 व कमाल 6151 रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत. प्रमुख बाजार समित्यांत हरभऱ्यास मागील पाच - सहा दिवसांपासून सरासरी दर 5800 रुपये प्रतिक्विंटल असा मिळत आहे. खानदेशात हरभऱ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, धुळ्यातील दोंडाईचा (ता. शिंदखेडा), शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा, नंदुरबार या बाजार समित्या प्रसिद्ध आहेत. यातील चोपडा, जळगाव येथील बाजार समित्यांत मागील आठवड्यातच हरभऱ्याची आवक सुरू झाली.
53 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
