पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 July
Follow
खानदेशात जिल्हा बँकांचे पीककर्ज वितरण उद्दिष्टापेक्षा अधिक
खानदेशात यंदा पीककर्ज वितरणाची गती बरी आहे. यात राष्ट्रीय बँका पीककर्ज वितरणात हात आखडता घेत आहेत. परंतु धुळे-नंदुरबार व जळगाव जिल्हा सहकारी बँकांनी पीककर्ज वितरण गतीने केले आहे. जिल्हा बँकांनी आपले पीककर्ज वितरण पूर्ण करून उद्दिष्ट मागील महिन्यातच गाठले. तसेच दोन्ही जिल्हा बँकांनी उद्दिष्टापेक्षा अधिकचे पीककर्ज वितरण केले आहे. धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेला सुमारे २३६ कोटी रुपये पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट होते. या बँकेने वसुली बन्यैपेकी केली. वसुली केल्यानंतर लागलीच एप्रिलमध्ये पीककर्ज वितरण सुरू केले.
59 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ