पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
18 May
Follow

खानदेशात जलसाठा चिंताजनक स्थितीत

खानदेशात जलसाठा चिंताजनक स्थितीत पोचला असून, गावोगावी टंचाई वाढली आहे. जळगावातील गिरणा, धुळ्यातील पांझरा व नंदुरबारातील दरा, देहली प्रकल्पातील जलसाठ्यात या महिन्यात झपाट्याने घट झाली आहे. खानदेशातील एकूण जलसाठा २८ टक्क्यांपर्यंत आला आहे. गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगावात आहे. परंतु या प्रकल्पाचा लाभ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या भागांत अधिक आहे. २१ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे सिंचन या प्रकल्पातील जलसाठ्याच्या मदतीने करता येते.


36 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ