पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
7 Apr
Follow

खानदेशात कांदा, मका काढणीस वेग

जळगाव: खानदेशात कांदा, मका, गहू कापणी व काढणीस वेग आला आहे. पुढे पावसाची शक्यता व्यक्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती असून, कापणी, मळणीचे काम गतीने सुरू आहे. मजूरटंचाईत गहू काढणीत मोठ्या हार्वेस्टरची मदत होत आहे. एकरी 1600 ते 1700 रुपये गहू मळणीसाठी मोठे हार्वेस्टरचालक घेत आहेत. मका, दादर ज्वारी, ज्वारी कापणी व मळणीचे कामही सुरू आहे. यासाठी मजुरांची अधिकची गरज आहे. मका, ज्वारी कापणी, कणसे गोळा करण्यासंबंधी एकरी चार हजार रुपये मजुरी घेतली जात आहे.


37 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ