सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात कैरीच्या आवकेत वाढ

खानदेशात कैरीची आवक वाढली आहे. सातपुडा पर्वत व लगतच्या भागासह जामनेर, पाचोरा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून कैऱ्यांची बाजारात आवक होत आहे. सातपुडा पर्वतातील खाटू प्रकारच्या आंब्यांच्या कैऱ्यांना मोठी पसंती नंदुरबार जिल्ह्यात आहे. आकाराने लहान, तीव्र आंबट आणि कडकपणा यासाठी या कैऱ्या प्रसिद्ध आहेत. लोणच्यासाठी या कैऱ्यांना मोठी मागणी असते. बाजारात कैरीचे दर ४० ते ६० व सरासरी ५० रुपये प्रतिकिलो, असे आहेत. दर यंदाही स्थिर आहेत. गावरान कैरीही स्थानिक भागातून बाजारात येत आहे.
38 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
