पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
11 Nov
Follow

खानदेशात केळी आवकेत मोठी घट

खानदेशात केळीची आवक घटली आहे. दरही कमाल १८०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत. दर्जेदार केळीला मागणी असून, केळीची पाठवणूक उत्तरेकडे अधिकची केली जात आहे. दिवाळी सणामुळे अनेकांनी केळीची काढणी केली नाही. यातच केळीच्या आवकेत मागील सहा ते सात दिवसांत सतत घट झाली आहे. केळीला खानदेशात उठाव कायम आहे. सध्या प्रति क्विंटल १५०० ते १८०० व सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटलचा दर केळीस खानदेशात आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही केळी दर कमाल १८०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत आहेत.


59 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ