पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

खानदेशात केळीच्या आवकेत मोठी घट

खानदेशात मागील आठवड्यात केळीच्या आवकेत मोठी घट झाली आहे. परंतु दर अस्थिर असून, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरमधील व्यापारी लॉबी ऐन सणासुदीच्या कालावधीत दर पाडत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. खानदेशात केळीची थेट किंवा शिवार खरेदी केली जाते. खानदेशात दर्जेदार केळी काढणीवर आहे. मध्य प्रदेशात मात्र जुनारी बागा, पिलबाग केळीमधून केळीची आवक बाजार समितीत होत असून, तेथे केळीचे लिलाव होत आहेत. कमी दर्जाची केळी तेथे अधिक येत आहे. तेथे केळी दरात मागील पाच ते सहा दिवसांत सतत घट झाली आहे.


42 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ