सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
खानदेशात कलिंगड लागवड रखडली

खानदेशात आगाप कलिंगडाची लागवड सुरू झाली होती, पण मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ, पावसाळी वातावरण यामुळे ही लागवड रखडली आहे. लागवड यंदा काहीशी वाढणार असून, सुमारे १००० ते १२०० हेक्टरवर कलिंगड पीक राहील, असे दिसत आहे. खरबुजाची लागवड मात्र यंदा अल्प असणार आहे. मागील वेळेस रब्बीत कलिंगडाची लागवड खानदेशात नंदुरबारातील तळोदा, शहादा भागात अधिकची घटली होती. खरिपातही लागवड कमीच होती. अनेकांनी गणेशोत्सव, नवरात्रीच्या कालावधीत आवक किंवा काढणी होईल, या दृष्टीने लागवडीचे नियोजन केले होते.
34 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
