पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
15 Jan
Follow

खानदेशात कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी निसवली

जळगाव: खानदेशात रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी काहीशी कमी आहे. परंतु तापी, अनेर, पांझरा, गिरणा आदी नद्यांच्या क्षेत्रातील पीक निसवले आहे. कोरडवाहू दादर ज्वारीही जोमात असून, कोवळ्या दाण्यांवर पक्षी हल्ला चढवत असल्याने शेतकरी ज्वारी राखण्याच्या लगबगीत आहे. खानदेशात यंदा सुमारे 39 हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. ही पेरणी मका पिकापेक्षा अधिक आहे. कारण ज्वारीचे दर टिकून होते. तसेच पुढे चाऱ्याची समस्या तयार होईल, यासाठी ज्वारीच्या चाऱ्यासही मोठी मागणी राहील. यामुळे अनेकांनी मका व इतर पिकांची लागवड, पेरणी कमी करून ज्वारीची पेरणी केली आहे.


40 Likes
1 Comment
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ