पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
8 Nov
Follow

खानदेशात पूर्वहंगामी तूर जोमात; १५ हजार हेक्टरवर लागवड

खानदेशात तुरीचे क्षेत्र यंदा वाढले आहे. पूर्वहंगामी किंवा सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात तूर पीक जोमात आहे. यंदा खानदेशात सुमारे १५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. तूर लागवड जळगाव जिल्ह्यात पाच ते सहा हजार हेक्टरवर केली जाते. मुक्ताईनगर, रावेर, जामनेर, बोदवड तालुक्यात लागवड अधिक असते. उर्वरित भागात आंतरपीक म्हणून किंवा आपल्या कुटुंबापुरते उत्पादन काढण्यावर शेतकरी भर देतात. तुरीची व्यावसायिक शेती रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेरात आहे. तर धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर आणि नंदुरबारमधील तळोदा, नवापूर भागांत काही शेतकरी तूर लागवड करतात.


43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ