पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Apr
Follow

खरिपासाठी १ लाख २३ हजार ३०० टन खते मंजूर

यंदाच्या (२०२४) खरीप हंगामासाठी (एप्रिल ते सप्टेंबर) परभणी जिल्ह्याला कृषी विभागाने १ लाख ५९ हजार ३०० टन खतांची मागणी केलेली असतांना कृषी आयुक्तालयाने विविध ग्रेडच्या १ लाख २३ हजार ३०० टन रासायनिक खते मंजूर केली आहेत. नॅनो युरियाच्या ५५ हजार ८०० व नॅनो डीएपी ३५ हजार ८०० बॉटल्स मंजूर आहेत. यंदाच्या मागणीच्या तुलनेत ३६ हजार टन कमी तर गतवर्षीच्या १ लाख २० हजार ४६० टन खतांच्या तुलनेत २ हजार ८४० टन एवढा जास्त खतसाठा मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे मोहीम अधिकारी तथा प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी दिली.


40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ