खत कंपन्यांऐवजी आता शेतकऱ्यांना थेट मिळणार खत अनुदान?
खतांवरील अनुदान खत कंपन्यांऐवजी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा पायलट प्रोजेक्ट देशातील काही जिल्ह्यात राबवला जाणार असल्याची बातमी द हिंदू बिझनेसलाईन या वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. केंद्र सरकार खतांवर अनुदान देतं. परंतु हे अनुदान शेतकऱ्यांऐवजी खत कंपन्यांना दिलं जातं. मात्र २०२५ या नवीन वर्षात खत मंत्रालय काही जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट राबवून डीबीटीमार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा करण्याची तयारी करत आहे. परंतु याबद्दल केंद्र सरकारने अद्याप खत उद्योगाशी चर्चा केलेली नाही. खत उद्योगाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खत अनुदान मिळेल, या चर्चने जोर धरला आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ