पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
25 Dec
Follow

कणकवली तालुक्यातील 3754 शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी पासून वंचित

कणकवली: कणकवली तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीसाठी 21 हजार 550 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यातील 19 हजार 893 एवढ्या शेतक-यांची ई-आधार लिंक असल्याने त्यांना सन्मान निधी प्राप्त होत आहे. मात्र तालुक्यातील 1 हजार 657 शेतकऱ्यांचे ई- आधार लिंक प्रलंबित आहे. तसेच 2 हजार 97 शेतकऱ्यांचे आधार सिंडींग, एनपीसीआय मॅपिंग, डीबीटी एनेबल करणे अपूर्ण असल्याने त्याना पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यात 3 हजार 754 शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी पासुन सध्या वंचित आहेत. अशी माहिती कणकवली तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे यांनी दिली.


24 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ