पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
31 Oct
Follow

जाणून घ्या दुभत्या जनावरांमधील कॅल्शियमचे महत्त्व (Know the importance of Calcium in dairy animals)


नमस्कार पशुपालकांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

कॅल्शियम सर्व वयोगटातील जनावरांसाठी आवश्यक आहे. आम्‍ही तुम्‍हाला सांगू इच्छितो की जनावरांना प्रति किलो दूध उत्‍पादनासाठी 2 ग्रॅम कॅल्शियम लागते. त्यामुळे आहारात कॅल्शियमची कमतरता असल्यास दुधाचे उत्पादनही कमी होते. गाभण जनावरांना गर्भाच्या विकासासाठी कॅल्शियमची गरज जास्त असते. मात्र, जनावरांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास लगेच लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांच्या संतुलित आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.

कॅल्शियमच्या पुरवठ्याबद्दल बोलायचे झाल्यास, जनावरांमध्ये त्याची कमतरता हिरवी पालेदार पिके किंवा शेंगासारख्या वनस्पतींच्या सेवनाने भरून निघते. याशिवाय आजकाल अनेक प्रकारची पूरक पशुखाद्यही बाजारात उपलब्ध आहेत. ज्याच्या सेवनाने सर्व खनिज घटक जनावरांना पुरविले जातात. कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, जनावरांच्या आहारात योग्य प्रमाणात देहात ‘वेटनोकल गोल्ड’ समाविष्ट करणे हा एक चांगला पर्याय आहे. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया याविषयीची सविस्तर माहिती.

जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी, दूध उत्पादनासाठी, रक्त गोठण्यासाठी, स्नायूंची हालचाल होण्यासठी, शारीरिक कार्य चांगले राहण्यासाठी खनिजे महत्त्वाची भूमिका बजावतात. कॅल्शियम हे प्राण्यांच्या शरीरात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे खनिज घटक आहे. शरिरात आढळणाऱ्या संपूर्ण खनिजाच्या 70% कॅल्शियम असते. दुध उत्पादनासाठी कॅल्शियम महत्वाचे ठरते. जनावरांच्या शरीरात कॅल्शियमचे प्रमाण जवळजवळ 1.33 टक्के (रक्तात 9 ते 11 मिलीग्रॅम/100 मिली, हाडांमध्ये 36 ग्रॅम/ 100 ग्रॅम ) एवढे असते. त्यामुळे कॅल्शियम युक्त समतोल पशुखाद्य जनावरांना देणे आवश्यक आहे.

जनावरांसाठी कॅल्शियम का आहे महत्त्वाचे?

  • जनावरांचे दात आणि हाडे मजबूत होतात.
  • हृदयाच्या प्रक्रिया सामान्य ठेवण्यास उपयुक्त.
  • शारीरिक दुखापत झाल्यास रक्त गोठणे सोपे होते.
  • स्नायूंची क्रिया अबाधित राहते.
  • वासराचा योग्य शारीरिक विकास होतो.

वासरांमध्ये कॅल्शियमचे महत्व:

  • गायीच्या गर्भामध्ये वासराची वाढ होत असताना वासराची कॅल्शियमची गरज गायीकडून भागवली जाते.
  • जन्मल्यानंतर लहान वासरांमध्ये चिकदुध (गायीच्या स्तनांतून येणारा पहिला स्त्राव) हा नवजात वासरांसाठी कॅल्शियमचा प्रमुख स्त्रोत आहे.
  • तसेच चिकदुधामधील रोग प्रतिबंधक पेशीमुळे वासरांचे लहान वयात होणा-या रोगांपासून संरक्षण होते. त्यामुळे वासरू जन्मल्यानंतर गायीच्या स्तनांतून येणारा पहिला स्त्राव (चिकदुध) वासराला पाजवणे आवश्यक आहे.
  • चीक दुधामध्ये मेद 3.5%, प्रथिने 14.3%, कर्बोदके 3%, कॅल्शियम 0.26%, फॉस्फरस 0.42%, लोह 0.2 मिलीग्रॅम/100 ग्रॅम एवढ्या प्रमाणत आढळते.
  • दुधामध्ये कॅल्शियम 0.13% एवढे असते.
  • वासरांसाठी चिकदुध आणि दुध हे कॅल्शियमचे महत्वाचे स्त्रोत आहेत.
  • दुधामध्ये लोह (0.05 मिलीग्रॅम/100 ग्रॅम) एवढ्या प्रमाणात आढळते.
  • लोह हे सर्वात कमी प्रमाणात दुधामध्ये आढळणारे खनिज आहे. त्यामुळे खानिजाची कमतरता टाळण्यासाठी वयाच्या दुस-या आठवडयानंतर वासराला, वासरांचे खाद्य देण्यास हळुहळू सुरूवात करावी; जेणेकरून वासरांची योग्यप्रकारे वाढ होईल.
  • हा आहार वासरास 3 महिन्यापर्यंत देता येतो.
  • चिकदुध तसेच दुध वासराच्या वजनाच्या 10% दिवसभरात तीन वेळा द्यावे.

कॅल्शियमच्या कमतरतेचे तोटे:

  • दुधाचे उत्पादन कमी होते.
  • जनावरांचे दात आणि हाडे कमकुवत होतात.
  • वासरू आणि गाईच्या शारीरिक विकासात अडथळे येतात.
  • दुधाचा ताप येण्याची शक्यता वाढते.
  • प्रसूतीदरम्यान गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो.
  • अनेक वेळा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जनावरे माती, दोरी, कापड इ. चावू लागतात.

देहात वेटनोकल गोल्डचे प्रमाण:

  • कॅल्शियमची गरज पूर्ण करण्यासाठी, जनावरांच्या आहारात दररोज 100 मिली देहात वेटनोकल गोल्डचा समावेश करा.
  • 20 मिली वेटनोकल गोल्ड वासरांना दिवसातून दोनदा खायला द्या.

तुम्ही तुमच्या जनावरांमध्ये कॅल्शिअम कमतरतेची कोणती लक्षणे पहिली? व काय उपाययोजना केल्या? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. जनावरांमध्ये कॅल्शियमची कमतरता कशामुळे भरून निघते?

जनावरांमध्ये कॅल्शियमची कमतरता हिरवी पालेदार पिके किंवा शेंगासारख्या वनस्पतींच्या सेवनाने भरून निघते.

2. जनावरांना सर्वात जास्त कॅल्शियमची गरज केव्हा असते?

गाभण काळात जनावरांना गर्भाच्या विकासासाठी कॅल्शियमची गरज जास्त असते.

3. कॅल्शियमच्या कमतरतेचे मुख्य तोटे कोणते?

दुधाचे उत्पादन कमी होते.

जनावरांचे दात आणि हाडे कमकुवत होतात.

51 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ