पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
2 Dec
Follow

कोकणात ऊस लागवडीकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

कोकणात ऊस लागवडीकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

कोकणातील जमीन व हवामान ऊस पिकासाठी योग्य आहे. खरीप पिकाची कापणी झाल्यानंतर योग्य ओलावा असताना जमीन 25 ते 30 सेंटिमीटर खोल नांगरावी आणि त्या स्थितीत 15 दिवस तापू द्यावी. यानंतर ढेकळे फोडून जमीन तयार करावी. दुसरी नांगरट ऊस लागवडीपूर्वी एक महिना व पहिल्या नांगरणीचे विरुद्ध दिशेने करावी. या नांगरणी वेळी उसाला द्यावयाच्या हेक्टरी 50 गाड्यांपैकी 25 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. म्हणजे मातीत चांगले मिसळेल. ट्रॅक्टरच्या साहाय्याने रीजरने 90 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात व उरलेले शेणखत लागवडीपूर्वी सऱ्यांमध्ये सारखे पसरून टाकावे. जमिनीच्या उतारानुसार सऱ्यांची लांबी ठेवून आडवे बांध व पाट पाडावेत.


48 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ