पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Aug
Follow
कोल्हापुरातील ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान : मुश्रीफ
शासन निर्णयातील त्रुटींमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणाऱ्या ११ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बँकेचे अध्यक्ष व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. महात्मा फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला होता. परंतु त्याला विलंबच होत होता. पीक कर्जाची नियमितपणे मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने एक निर्णय २९ जुलै २०२२ रोजी जारी केलेला होता.
34 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ