कोल्हापूर जिल्ह्यात खतांचा तुटवडा; आवश्यक खते नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी कामास वेग आल्याने शेती रिकामी झाल्यानंतर मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, जिल्ह्यात १० : २६ : २६ आणि डी. ए. पी. खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, उसाच्या लागणीला डोस देणे व भरणीच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाच्या पोर्टलवर संयुक्त खताचा एकत्रित साठा दिसतो. मात्र, तुटवडा असलेली खते दिसत नाहीत. याबाबत जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी सुशांत लव्हटे यांना विचारणा केल्यास ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात पोर्टलवर संयुक्त खते एकत्रित १६ हजार ८८३ टन दिसतात. इफको कंपनीचे १०: २६ : २६ खत १ हजार १३० टन, कृभकोचे १० टन उपलब्ध आहे. डी.ए.पी., एम.ओ.पी. खते उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी ठराविक एकाच खताची मागणी करू नये. संयुक्त खतांचा वापर करावा. अशी माहिती लव्हटे यांनी दिली.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
