दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना (Krishi Sanjeevani Scheme for Disabled Farmers)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
आपल्या देशामधील शेतकऱ्यांसाठी विविध योजना आपले सरकार नेहमी राबवत असते. आपल्या देशात असे अनेक शेतकरी आहेत जे अपंग आहेत, अशा अपंग व दिव्यांग शेतकऱ्यांना रोजच्या गरजा पूर्ण करणे देखील खूप अवघड जाते. हेच लक्षात घेऊन राज्य सरकारने या दिव्यांग म्हणजेच अपंग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी म्हणजेच हॉरटीकल्चर योजना आणली आहे. महाराष्ट्रात ही योजना वित्त आणि विकास महामंडळ या विभागातर्फे राबवली जात आहे. आजच्या या भागात आपण याच योजनेविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेची वैशिष्ट्ये:
- या योजनेअंतर्गत, दिव्यांग शेतकऱ्यांना फलोत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि विद्यमान व्यवसायाची वृद्धी करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- फलोत्पादन म्हणजे विविध फळे, फुले, भाजीपाला यांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये शेतामध्ये किंवा बागेमध्ये छोट्या फळझाडांची काळजी घेतली जाते.
- फलोत्पादनामध्ये सुशोभीकरण, सोयी-सुविधा, तसेच अन्नधान्याचे उत्पादन यांचा समावेश होतो.
- दिव्यांग शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते, कारण अनेकदा ते दारिद्र्य रेषेखाली जीवन जगतात. त्यांच्या आर्थिक स्थितीवर विचार करून राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे.
कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेचे उद्देश:
- राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करणे.
- दिव्यांग शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे याची जाणीव करून देणे.
- दिव्यांग शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य देणे.
कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेंतर्गत लाभ:
प्रकल्प मर्यादा: रुपये 10 लाख पर्यंत कर्ज.
लाभार्थींचा सहभाग: 5%.
राज्य महामंडळाचा सहभाग: 5%.
राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग: 10%.
व्याजदर:
पुरुषांसाठी 6% (रुपये 5 लाखांपर्यंत)
महिलांसाठी 5% (रुपये 5 लाखांच्या पुढे 7%)
कर्ज परतफेडीचा कालावधी: 5 वर्षे.
मंजुरी अधिकार: 5 लाखांपर्यंत राज्याचे अधिकार व 5 लाखांनंतर NSHFDC.
कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेसाठी आवश्यक पात्रता:
- अर्जदार दिव्यांग असावा.
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असावा.
- दिव्यांग प्रमाणपत्र असावे.
योजनेसाठी अटी आणि नियम:
- अर्जदार दिव्यांग असावा.
- अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा. राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
- अर्जदाराकडे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असावे.
- प्रकल्पाची मर्यादा 10 लाखांपर्यंत असावी.
कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- अर्जावर पालकांची (Legal Guardian) सही असणे आवश्यक आहे.
- कर्ज अर्जाच्या 2/3 प्रती.
- 15 वर्ष महाराष्ट्रात वास्तव्य केले याबाबतचा दाखला/डोमीसाईल प्रमाणपत्र (तहसीलदार प्रमाणित).
- वयाचा/शाळा सोडल्याचा दाखला.
- दिव्यांगत्वाचा दाखला (सिव्हील सर्जन प्रमाणित).
- अनुभव प्रमाणपत्र.
- निवडणूक आयोग व आधार ओळखपत्र.
- 3/2 पासपोर्ट व पूर्ण आकाराचे फोटो.
- अर्जदाराच्या नावे जमीन/शेती असण्याबाबतचा पुरावा (7/12 व 8 अ चा उतारा).
- व्यवसाय करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थेचा नाहरकत दाखला.
- व्यवसाय प्रकल्प अहवाल व दरपत्रक.
- कर्जबाजारी/वित्तसंस्थेचा थकबाकीदार नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र.
कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेसाठी अर्ज प्रक्रिया:
- या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला खालील पद्धतीने अर्ज करावा लागेल:
- अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील या योजनेच्या अधिकृत कार्यालयाला भेट द्यावी लागेल.
- कार्यालयातून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
- भरलेला अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
- या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता देणे, त्यांना सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा आहे.
- या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेविषयी तुम्हाला माहित आहे का? तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातच्या “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. दिव्यांग शेतकऱ्यांसाठीच्या कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेसाठी अर्ज कसा करावा?
अर्जदाराने आपल्या क्षेत्रातील अधिकृत कार्यालयाला भेट देऊन अर्ज घ्यावा, आवश्यक माहिती भरून कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावा.
2. दिव्यांग शेतकऱ्यांसाठीच्या कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेसाठी किती कर्ज मिळू शकते?
दिव्यांग शेतकऱ्यांसाठीच्या कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेअंतर्गत, दिव्यांग शेतकऱ्यांना रुपये 10 लाख पर्यंत कर्ज मिळू शकते.
3. दिव्यांग शेतकऱ्यांसाठीच्या कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजनेसाठी किती व्याजदर लागतो?
पुरुषांसाठी वार्षिक व्याजदर 6% आणि महिलांसाठी 5% आहे. रुपये 5 लाखांच्या पुढे महिलांसाठी व्याजदर 7% आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
