पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
26 Jan
Follow

लालचुटूक स्ट्रॉबेरीचे दर गडगडल्याने काळवंडली, जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली

कुडाळ (जि. सातारा) : जावळी तालुक्यात प्रामुख्याने कुडाळ, आखाडे सोमर्डी, महू, शिंदेवाडी आदी गावांमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेतले जाते. साधारणपणे 20 ते 22 हेक्टर जमिनीवर सप्टेंबर महिन्यात स्ट्रॉबेरी पिकाची लागण होते. डिसेंबर महिन्यापासून हा हंगाम सुरू होत आहे. पुणे, मुंबई, तसेच जॅमचे चॉकलेट तयार करणाऱ्या कंपनीकडून याची मागणी होते. सद्य:स्थितीत स्ट्रॉबेरीचा हंगाम संपण्यास अजून दोन महिने कालावधी आहे; मात्र, कंपन्या केवळ वीस ते तीस रुपये दराने खरेदी करीत असल्याने स्ट्रॉबेरी रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.


46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ