लातूर जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टी, हिंगोलीत उघडीप; धाराशिवमध्ये नुकसान

लातूर जिल्ह्यात चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी पहाटे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. वादळी वाऱ्याने उसासह ज्वारीचे पीक भुईसपाट झाल्याने नुकसान झाले आहे. जिल्ह्यात बुधवारी सकाळी 8 वा. पर्यंत सरासरी 31.4 मिमी पावसाची नोंद आहे. जिल्ह्यातील पाच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून यात भादा मंडळात 92.3, पानचिंचोली 74, आष्टा 67.5, देवणी 82.3, बरोळ 77.3 मिमी पाऊस झाला. या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने उसासह ज्वारीला फटका बसला आहे. हरभरा, तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.जिल्ह्यांत 30 नोव्हेंबरला तुरळक प्रमाणात वादळ वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
