जाणून घ्या जनावरांमधील जिवाणूजन्य लिस्टेरिओसिस आजाराविषयीची माहिती (Learn about Listeriosis, a bacterial disease in animals)

नमस्कार पशुपालकांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
लिस्टेरिओसिस हा एक झूनोटिक आजार जो जनावरांपासून माणसाला किंवा माणसापासून जनावरांना होऊ शकतो. जनावरांपासून माणसास होणारे आजार प्रामुख्याने जिवाणूजन्य, विषाणूजन्य, आदिजीवजन्य आणि बुरशीजन्य या प्रकारात विभागले जातात. असे आजार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या पशुपालकाला होण्याची शक्यता असते, याला झूनोटिक आजार म्हणतात. लिस्टेरिओसिस प्रामुख्याने लिस्टएरिया मोनोसाइटोजन नावाच्या जिवाणूमुळे होतो. आजच्या या भागात आपण जनावरांमधील याच जिवाणूजन्य लिस्टेरिओसिस या आजाराविषयी जाणून घेणार आहोत.
मनुष्यांमध्ये लिस्टेरिओसिस आजार कोणाला होतो?
मनुष्यामध्ये लिस्टएरिया हा संसर्ग गर्भवती महिलांना, नवजात बालकांना, 65 किंवा त्याहून अधिक वयोगटातील लोकांना आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना होण्याची जास्त शक्यता असते.
जनावरांमध्ये लिस्टेरिओसिस आजारामुळे काय होते?
प्रादुर्भाव झालेल्या जनावरांमध्ये इन्सिफलाइटिस, सेफ्टीसेमिया आणि गर्भपात होऊ शकतो. कळपाचे रोगग्रस्त होण्याचे प्रमाण साधारणपणे 10 टक्के एवढे असते, तर मृत्युदर जवळ जवळ 100 टक्के असतो.
प्रसार:
- आजारी जनावरांची लाळ, विष्ठा, मूत्र, दूध, गर्भाशयातील स्राव.
- तोंडातून ट्रायजेमिनल या मज्जातंतूद्वारे जंतूचे संक्रमण होते.
- दूषित स्त्रावामुळे दूषित झालेला चारा जनावरांनी खाल्ल्यावर जिवाणू आतड्याच्या श्लेषमल त्वचेद्वारे प्रवेश करतो आणि तेथून रक्तामध्ये प्रवेश करतो त्यामुळे बॅक्टेरियाची स्थिती तयार होते.
- खराब झालेल्या सायलेज (कमी आम्लीय सामू) सेवन केल्यामुळे जनावरांमध्ये होऊ शकतो.
जनावरांमधील लक्षणेः
- जनावरांमधील लक्षणे ही जिवाणूंच्या स्वरूप व प्रकारावरून ठरतात.
- चिंताग्रस्त स्वरूपाचा प्रकार मेंदू व चेतासंस्थेचा आजार, हा प्रकार सर्व प्राण्यांमध्ये आढळतो, परंतु मेंढीमध्ये तो अधिक तीव्र स्वरूपाचा असतो. या प्रकारामध्ये जनावराचा मृत्यू तीन ते चार दिवसांत होतो.
- तापमानात वाढ झाल्यामुळे जनावरे सुस्त दिसतात, मान एकीकडे खेचून जनावरे वर्तुळाकार पद्धतीने फिरतात त्यामुळे यास गोलाकार फिरण्याचा आजार किंवा सरकलिंग डीसिज असे म्हणतात.
- एकतर्फी कान, पापण्या, ओठ व डोळ्यांसह चेहऱ्याचा पक्षघात होऊ शकतो.
- शेवटी जनावर एका बाजूला पडून श्वसनाची क्रिया निकामी झाल्यामुळे मृत्युमुखी पडू शकतो.
- गाभण जनावरांच्या गर्भाशय संसर्गास हे जिवाणू अति संवेदनशील असतात, त्यामुळे गाभण जनावरे तिसऱ्या तिमाहीमध्ये गाभडतात.
- डोळ्यात लालसरपणा दिसतो.
- डोळ्यांतून पाणी येते व धूसर दिसते.
माणसांमधील लक्षणे :
गर्भवती महिलांमध्ये सामान्यतः ताप येणे, स्नायू वेदना, फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अशा महिलांमध्ये गर्भपात 20 टक्के) अकाली प्रसूती, नवजात बालकाचा मृत्यू (3 टक्के).
निदान:
सिरोलॉजी चाचणी, एलिझा, अँटिबायोटिक संवेदनशील चाचणी
प्रतिबंध आणि नियंत्रण :
- आजारी जनावर वेगळे करून त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार करून काळजी घ्यावी.
- आजार बरा झाल्याची खात्री झाल्यानंतरच गोठ्यातील जनावरांमध्ये मिसळावे.
- कच्चे दूध प्यायल्यामुळे लिस्टएरिया होतो, त्यामुळे दूध उकळून प्यावे किंवा लिस्टएरिया झालेल्या जनावरांपासून मिळणाऱ्या दुधाचे सेवन करू नये.
- कत्तलखान्यात काम करणारे कामगार व पशुवैद्यक तसेच जनावरांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.
- जनावरांना कुजलेल्या भाज्या खाऊ घालू नये.
- रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागातील मुरघास जनावरांना खाऊ घालू नये.
- रोगप्रतिकार शक्ती कमी झालेले जनावरे याच्या प्रादुर्भावासाठी अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे या आजारामध्ये योग्य खबरदारी वेळेवर घेणे आवश्यक आहे.
या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. या गोष्टींचे पालन करून तुम्ही जनावरांमधील जिवाणूजन्य लिस्टेरिओसिस आजारावर नियंत्रण मिळवू शकाल. याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह देखील शेयर करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. लिस्टेरिओसिस आजार कोणाला होऊ शकतो?
लिस्टेरिओसिस हा एक झूनोटिक आजार जो जनावरांपासून माणसाला किंवा माणसापासून जनावरांना होऊ शकतो.
2. लिस्टेरिओसिस आजार कोणत्या जिवाणूमुळे होतो?
लिस्टेरिओसिस प्रामुख्याने लिस्टएरिया मोनोसाइटोजन नावाच्या जिवाणूमुळे होतो.
3. जनावरांमध्ये लिस्टेरिओसिस आजारामुळे काय होते?
प्रादुर्भाव झालेल्या जनावरांमध्ये इन्सिफलाइटिस, सेफ्टीसेमिया आणि गर्भपात होऊ शकतो. कळपाचे रोगग्रस्त होण्याचे प्रमाण साधारणपणे १० टक्के एवढे असते, तर मृत्युदर जवळ जवळ 100 टक्के असतो.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
