पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
20 Sep
Follow
'मांजरा'चा अंतिम दर २ हजार ७०५ रुपये
केंद्र सरकारच्या एफआरपीनुसार प्रमाणित साखर उताऱ्यास २ हजार ५०५ रुपये भाव असताना विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने इतर उपपदार्थांच्या विक्रीतून झालेल्या नफ्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पाडव्यापूर्वी प्रति टन २ हजार ६०५ रुपये प्रमाणे ऊस बिलापोटी यापूर्वी दिले. आणखी १०० रुपये देण्याचे कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख यांनी जाहीर केले. त्यामुळे मांजरा साखर कारखान्याचा उसाचा अंतिम दर आता २ हजार ७०५ रुपये झाला आहे. कारखाना अधिमंडळाची ४० वी सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. १४) शहरातील कातपूर रस्त्यावरील पार्वती मंगल कार्यालयात दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
64 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ