पोस्ट विवरण
सुने
पशुपालन ज्ञान
पशुसंवर्धन
DeHaat Channel
29 Jan
Follow

मासे पालनाने वाढवा उतपन्न

मासे पालनाने वाढवा उतपन्न

भारतात गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन मोठ्या प्रमाणावर केले जाते. भारतात प्रामुख्याने कार्प, कॅटफिशेस आणि कोळंबी माशांचे संवर्धन केले जाते. कार्प माशांचे संवर्धन पॉली कल्चर आणि कंपोझिट कल्चर अशा दोन प्रकारे करता येते. मत्स्य शेतीत नफा मिळवायचा असेल तर माशांच्या जातींची योग्य निवड महत्त्वाची आहे.
मत्स्शेतीत उपयुक्त माशांच्या जाती:
इंडियन मेजर कार्प- या प्रकारांमध्ये भारतीय माशांच्या जातींचा समावेश होतो. यामध्ये कटला, रोहू, मृगळ या माशांच्या जातींचा समावेश होतो.
कटला- ही माशाची जात पृष्ठभागाकडील अन्न खाते. या माशाचा वाढीचा विचार केला तर पहिल्या वर्षी दीड किलोपर्यंत वाढतो. त्याची लांबी 38 ते 45 सेंटिमीटर पर्यंत असते.
रोहू- या जातीचा मासा तलावातील मध्यभागातील अन्न खातो. या जातीच्या माशांचे प्रमुख अन्न हे प्लवंग, चिखलामध्ये असलेले सेंद्रिय पदार्थांचे अन्नकण आणि पाणवनस्पती आहे. हा मासा सातशे ते आठशे ग्रॅमपर्यंत वाढतो. त्याची लांबी 35 ते 40 सेंटिमीटर असते.
मृगळ- हा मासा शेततळ्यातील सेंद्रिय अन्न पदार्थ खातो. त्यासोबतच पाणवनस्पतींचे लहान तुकडे, शेवाळ, प्लवंग खातो.
गवत्या किंवा ग्रास कार्प- या माशांचे खाद्य प्रामुख्याने गवत आणि पान वनस्पती आहे. पाण्यात वाढणाऱ्या वाढणाऱ्या गवताच्या नियंत्रणासाठी हा मासा उपयोगी ठरतो.
तुम्ही कोणत्या माशांचे पालन करता? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच अशाप्रकारच्या अजून माहितीसाठी "पशुसंवर्धन" चॅनेलला फॉलो करायला विसरू नका.


49 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ